मोघा महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर

उदगीर (एल पी उगिले) मोघा महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर व बसवेश्वर महाराज जयंती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर महसूल मंडळ विभाग मोघा अंतर्गत तलाठी सज्जा बामणी येथे आयोजित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोघा मंडळ विभागामध्ये बामणी येथे समाधान शिबिराचे आयोजन करून, या शिबिरामध्ये बामणी गावचे उपसरपंच दिलीप कांबळे व शिवदास स्वामी यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उत्पन्नाचे प्रमाणपत्र 12, सातबारा 5,जातींचे प्रमाणपत्र 2,
रहिवासी प्रमाणपत्र 2, उद्यम आधार 2, यांचे वाटप करून ,सध्या महाराष्ट्र शासनाकडून चालू असलेल्या नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना, तसेच संजय गांधी निराधार योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, तसेच पालकमंत्री शेतकरी पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त योजना , जन्म मृत्यू दाखले प्रमाणपत्र,अग्रीस्टेक शिल्क लोकांचे आधार लिंक करून घेतले व या वरील बाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे जिवंत सातबारा,फार्मर आयडी, शिधापत्रिकांचे ई. के वाय सी करणे पीक पहाणी याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मंडळ अधिकारी मोघा किशोर पाटील साहेब ग्राम महसूल अधिकारी बामणी मोघा विनिता पाटील, रावणगावं सतीश लोहार, धोंडीहिप्परगा मिनाक्षी शिंदे, ग्रामसेवक संजिव गुरमे, सरपंच राजकुमार बिराजदार, तंटामुक्ती अधक्ष बालाजी पाटील व बाळासाहेब बिराजदार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.