कामगार हेच प्रगत महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत – स्वप्निल जाधव

0
कामगार हेच प्रगत महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत - स्वप्निल जाधव

उदगीर (एमपी उगिले) कामगार हेच राज्याच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. स्वतःच्या घरावर छत नसले तरी हरकत नाही परंतु इतरांच्या घरावर छत निर्माण करणे आपल्या आद्य कर्तव्य आहे. अशा भावनेतून कष्टकरी काम करत असतात. त्या कामगारांना अभिवादन करण्यासाठी हा कामगार दिन आहे. ते सतत काम करत असतात त्यांच्या कामाचा गौरव करून श्रम प्रतिष्ठा वाढवली पाहिजे असे विचार सामाजिक कार्यकर्ते युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित प्रहार कामगार आघाडीच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
प्रहार जनशकती पक्ष प्रणित प्रहार कामगार आघाडी यांच्या वतीने उदगीर येथे विवेक वर्धनी शाळे समोर कॉर्नर पाॅईट या ठिकाणी उदगीर तालुक्यातील विविध बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणारे महिला, भगिनी व पुरुष बांधकाम कामगारांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला, भगिनी यांना साडी, चोळी व शाल, ट्राफी देऊन तर पुरुष कामगार यांना शाल श्रीफळ व कामगार स्मृतिचिन्ह देऊन गौरविले गेले.
जेष्ठ कामगार पुरस्कार कुशल कामगार पुरस्कार व आदर्श कामगार पुरस्काराने उदगीर तालुक्यातील महिला कामगार व तसेच पुरुष कामगाराना विविध पुरस्कार देऊन कामगार दिन व महाराष्ट्र दिन प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित प्रहार कामगार आघाडी च्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतजी होटीकर उद्‌घाटक पो.नि. उदगीर शहर दिलीप गाडे, प्रमुख पाहूणे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील जाधव, मानवी हक्क अभियान चे ज्ञानेश्वर सूर्यवंशी, नितीन ऐकुरकर, संभाजी ब्रिगेडचे राजकुमार माने , धिरज कसबे ,विश्वनाथ गायकवाड अखिल भारतीय सेना संपर्क प्रमुख,
सना उलाह खान सामाजिक कार्यकर्त, आकाश कस्तूरे भिम आर्मी, संग्राम अंधारे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती विनोद तेलंगे प्रहार उपजिल्हा प्रमुख लातुर , ज्ञानेश्वर भोसले प्रहार अध्यक्ष देवणी, शहाजान शेख, शहर अध्यक्ष प्रहार उदगीर,आक्रम शेख, प्रहार कामगार कोषाध्यक्ष ,मोहमद चौधरी प्रहार शहर उपाध्यक्ष,राजु पाटील साईनाथ, मुकेश कांबळे प्रहार, दता सुर्यवंशी , आम्मु पठाण आनंद, बालाजी बिरादार, महादेव मोतीपवळे, सुर्यभान चिखले, अमित खंदारे होते. या कार्यक्रमाचे संयोजक माधव शेळके, अंतेश्वर सुर्यवंशी, जम्मू मोसा. शेख,हसन शेख, ज्ञानोबा शिंदे,महमद शेख,इलाई पठाण, गणेश शिंदे, प्रहार कामगार आघाडी यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक माधव शेळके तर आभार भारत होटीकर मानले,

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!