मातृभूमीत सुरक्षित मातृत्वासाठी प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाचे औचित्य
उदगीर (एल पी उगिले) तज्ञ स्त्रीरोग संघटना व मातृभूमी व कस्तुराबाई नर्सिंग स्कूलच्या वतीने राष्ट्रीय मातृत्व दिनानिमित्त व्याख्यान व प्रात्यक्षिक द्वारे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी होत्या, तर यावेळी तज्ञ स्त्री रोग संघटनेच्या तालुकाध्यक्ष डॉ. योगीराज शिद्रे, सचिव डॉ. सुप्रिया जगताप, सहसचिव प्रियंका राठोड, सदस्य प्राजक्ता गुरुडे यांची उपस्थिती होती.
यावेळी मातृभूमी व कस्तुराबाई नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांना गरोदर मातेचा आहार व विहार कसा असावा? गरोदर माता व बाळाची काळजी कशी घ्यावी? जेणेकरून माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होईल. याविषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी बाळ रडले नाही तर काय करावे? ,बाळाची श्वसन नलिका कार्यरत करण्यासाठी परिचारिकांना प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर प्राजक्ता गुरुडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा बिभिषण मद्देवाड यानी केले. आभार प्रतीक्षा काकडे यांनी मानले. यावेळी अंकिता मर्ढे , राहुल जाधव, मीरा पाटील, उषा सताळकर, ओंकारे जगदीशा यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले . यावेळी कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
