विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे ध्येय – ॲड. सुपोषपाणि आर्य.

0
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे ध्येय - ॲड. सुपोषपाणि आर्य.

उदगीर (एल पी उगिले) : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेद्वारे केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेले नविन शैक्षणिक धोरण 2020.त्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025 पासून केली जाणार आहे. त्या अनुषंगाने श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेद्वारे आयोजित “चला माणूस घडवू या “नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी व कार्यशाळा संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणि आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
“चला माणूस घडवू या” नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा व अंमलबजावणी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. विक्रम संकाये, सहसचिव अंजुमणी आर्य, श्यामलाल हायस्कूल चे शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर, रामभाऊ मोतीपवळे, रवी हसरगुंडे, माजी मुख्याध्यापक मोहनराव निडवंचे तसेच ॲड. रमाकांत चटणाळे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा व अंमलबजावणी या कार्यक्रमास श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आस्थापना प्रमुख, निमंत्रित पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेची सुरुवात ॲड. सुपोषपाणि आर्य लिखित “स्वागत करितो आम्ही लेकरे ” या उत्कृष्ट अशा प्रार्थना गीताने झाली.
चला माणूस घडवू या नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा व अंमलबजावणी या कार्यक्रमास महत्वपूर्ण असे मार्गदर्शन ॲड. सुपोषपाणि आर्य यांनी केले.नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता, विद्यार्थी मानसिकता, विद्यार्थी सर्वांगीण विकास, कार्य कुशल विद्यार्थी व मानव संपत्ती निर्माण करणे हेच ध्येय उराशी बाळगून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान अविरतपणे देत आहे. नविन शैक्षणिक धोरणातील अनेक विद्यार्थी सर्वांगीण विकासाचे उपक्रम श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था अगोदरपासूनच राबवत आहे. यापुढेही नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था नेहमी आयोजित करेल व त्यांचे यशस्वी अंमलबजावणी करेल. यासंबंधी मार्गदर्शन ॲड. सुपोषपाणि आर्य यांनी केले.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था नेहमीच विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे गेली अनेक दशकापासून शिक्षण क्षेत्रामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्याचमुळे या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी देशात तसेच जागतिक पातळीवर विविध महत्त्वपूर्ण पदावर आपली सेवा देत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे मत संस्था अध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी प्रिय कसे होतील?, विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा साधता येईल?, कार्य कुशल विद्यार्थी कसा निर्माण करता येईल?, शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण कसे देता येईल? यासंबंधी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सुपोषपाणि आर्य यांनी केली.
या कार्यशाळेत श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना वैचारिक मेजवानी व पुढील शैक्षणिक कार्यासाठी सुपोषपाणि आर्य याच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनामुळे प्रेरणा मिळाली, त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अधिक आत्मविश्वासाने आणि उत्साहाने करता येईल. असा विश्वास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केला.
चला माणूस घडवूया नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा व अंमलबजावणी हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण भोळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!