इनरव्हील क्लब व येलम महिला मंडळ यांच्या विद्यमाने सुखमणी वृद्धाश्रमास नवीन वास्तु बांधकामासाठी निधी

0
इनरव्हील क्लब व येलम महिला मंडळ यांच्या विद्यमाने सुखमणी वृद्धाश्रमास नवीन वास्तु बांधकामासाठी निधी

उदगीर (एल पी उगले) सध्या सुखमणी वृद्धाश्रमाच्या जुन्या इमारतीमध्ये दहा-बारा खोल्या असूनही वृद्धांना जागा अपुरी पडते. महिला व पुरुष मिळून 30 वृद्ध आहेत. वरचेवर वृद्धांची संख्या वाढत आहे, म्हणून लोकसहभागातून नवीन वास्तूचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी इनरव्हील क्लब व येलम महिला मंडळांनी जवळपास 70 महिलांनी एक लाख 81 हजार 101 रुपये देणगी दिली आहे. ही देणगी सुखमणी वृद्धाश्रमाच्या कर्मचारी सौ. अनुसया पांचाळ यांच्याकडे देण्यात आली. याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे, सचिव रेखा बालुरे, आय एस ओ सुनंदा पदातूरे, ट्रेझरर सुरेखा उगिले, डॉ. अंजली उगिले, प्रेमा वतनी, वैशाली चामे, प्राध्यापिका सारिका उगिले, डॉ. ललिता किनगावकर, सुनिता गुनाले, दर्शना हेंगणे, मेघना रेड्डी, कलावती भातांब्रे, मद्रेवार, अरुणा जाधव यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!