जमहूर हायस्कूल उदगीर च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम, उर्दू माध्यमाचा केंद्रात अव्वल निकाल

उदगीर (एल पी उगिले) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2025 मध्ये यावर्षीही सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमांमध्ये जमहूर हायस्कूल ने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत 100% निकाल दिला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत संस्थेचे व शाळेचे नाव उज्वल केले आहे. उदगीर शहरात उर्दू केंद्रातून शाळेने अव्वल येण्याचा मान राखत100% निकाल शाळेने दिला आहे.या परीक्षेत विशेष प्राविण्यात 19 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 33 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 14 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
तसेच 90% पेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त करणारे विद्यार्थी शेख सानिया ऐनोद्दीन 97%, तांबोळी शिफा अनम नजीब 95.40 टक्के, शेख असफिया इसा 95 टक्के, मनियार उबेदूर रहमान इस्माईल 93 टक्के,मोहम्मद आतिफ मोहम्मद मुसाखान 90%, शेख जुफिशा इमरोज साजिद 90% असे आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक राजापटेल अब्दुल बाकी म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत आणि शिक्षकांनी केलेले परिश्रम व पालकांनी दिलेले प्रोत्साहन यामुळेच हे उत्कृष्ट यश प्राप्त झाले आहे.”
संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, उपाध्यक्ष बागवान मोहम्मद अली, सचिव डॉ. अंजुम कादरी , सहसचिव इब्राहिम अब्दुल सत्तार व संस्थेचे सदस्य कुरेशी अब्दुल रशीद, सय्यद लाल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षक, पालकांच्या समर्थनाचे हे फळ आहे. या निकालामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रेरणादायी सोहळ्याला विद्यार्थी, पालक तसेच पर्यवेक्षक गोलंदाज वाजीद आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जमहूर हायस्कूलच्या या उत्कृष्ट निकालामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.