ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश,गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम

उदगीर (एल पी उगिले) येथील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अग्रक्रमावर असलेल्या ब्राईट स्टार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे. ब्राईट स्टारचे दोन विद्यार्थी बिरादार प्रथमेश ओंकार १००% व कु हर्षदा राजकुमार गरड 100% यांनी 100 टक्के गुण मिळवीले आहेत.
ह्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच शाळेचा निकाल प्रतिवर्षा प्रमाणे 100% लागला आहे, 8 विद्यार्थी 95% पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत, 13 विद्यार्थि 90% पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत.
यापूर्वीही ब्राईट स्टारच्या विद्यार्थीनी कु.स्नेहल मुत्तेपवार 100%, कु सुप्रिया येलगुंदे 100%, कु. शेख इफ्रा, कु. पुनम स्वामी यांनी 100% गुण मिळवून बोर्डात प्रथम स्थान मिळवून शाळेच्या शैक्षणिक नावलौकिकामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. शाळेतील गुणवंत विद्यार्थी असे,बिरादार प्रथमेश १००%, गरड हर्षदा १००%,सय्यद सना ९९%,तांबोळी अमान ९७%, बिरादार समीक्षा ९७%,वीरकपाळे रोहिणी ९६%,कर्णे अथर्व ९६%, निवडगे नंदिनी ९५%,ढवळे दिव्या ९५%,उत्कर संस्कृती ९३%, गणापूरे चैतन्य ९३%,मोरे अश्विनी ९२%,कांबळे वैभव ९१% असे आहेत.
या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचीव प्रा विरभद्र घाळे व प्रा सौ प्रेमा घाळे, डॉ भाग्यश्री घाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. शिक्षकवृंद यांच्या परिश्रमांचेही कौतुक करून आगामी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.