श्यामार्य कन्या विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेत 98.50% निकाल

उदगीर (एल पी उगिले) उदगीर मधील मुलींसाठी चालणारी सर्वात मोठी शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या श्यामार्य कन्या विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.५० टक्के लागला आहे. या परीक्षेत विशेष प्राविण्यासह 51 विद्यार्थी,प्रथम श्रेणीत 49,द्वितीय श्रेणीत 26 विद्यार्थिनी पास झाले आहेत. नवटक्के नंदिनी मल्हारी या मुलीने 100 टक्के गुण घेऊन यशाची उज्वल परंपरा राखली आहे.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुडकर,सचिव विक्रम संकाये, सहसचिव अंजुमनीताई आर्य यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना उत्तुंग यश संपादन करण्यासाठी वेळोवेळी उपक्रम आयोजित केले जातात. संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून एसएससी बोर्ड परीक्षेत उत्तम यश संपादन करण्यात आले.
90% पेक्षा जास्त प्राप्त गुण विद्यार्थ्यांनी एकूण 16 आहेत.
नवट्क्के नंदिनी मल्हारी 100%, डावळे आदित्ती बालाजी 96.80%., गुदळे वैष्णवी शिवकुमार 95.40%., सुर्यवंशी वैष्णवी एकनाथ 94.80%, डुबेवार श्रीया मनोजकुमार 94.60%., नुत्ते भक्ती शिवकुमार 94,60%., मुत्वेपवार संस्कृती पवन 98.60%., गुळंगे श्रद्धा नागेश 98%,शेट्टे पुनम धनाजी 93%,बिरादार ज्ञानेश्वरी मनोजकुमार 92.80%,तोंडचिरे अक्षरा गंगाधर 91.40%,,जाधव सानिका संतोष 91.40%.,लांडगे स्नेहा विठ्ठल 91-40%,पाटील ईशा अमित 91.207.,बेलूरे इशिका सतिश 91%., बिरादार इश्वरी बालाजी 90%. टक्केवारी प्राप्त करून यश संपादन केले आहे .
अदिती डावळे, श्रद्धा गुळंगे, ज्ञानेश्वरी बिरादार ,इशिका बेलुरे, वैष्णवी गुदळे, श्रीया डुबेवार, नंदिनी नवटक्के या 7 मुलींनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण भोळे, पर्यवेक्षक विजय बैले,परीक्षा विभाग प्रमुख मीनाक्षी ऐनिले, सहाय्यक राहुल गुरमे, सचिन तिवारी, सतनप्पा हुरदळे, माधव कांबळे, माणिक कांबळे,संभाजी कोयले,सारिका कुलकर्णी, वनमाला मुक्कावार,विक्रम मलकापूरे, बाळासाहेब कराड या सर्व विषय शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर, सचिव विक्रम संकाये, सहसचिव अंजुमनीताई आर्य यांनी केले.