श्री पांडुरंग विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

0
श्री पांडुरंग विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

उदगीर (एल पी उगिले) तालुक्यातील
श्री पांडुरंग विद्यालयाने दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवून यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.या परीक्षेत बेंबडे सोनाली सुरेश या विद्यार्थीनीने 94 % गुण मिळवून प्रथम आली आहे , गायकवाड समिक्षा गणपती या विद्यार्थीनीने 87.40% गुण घेवून द्वितिय आली आहे ,धनगे वैष्णवी प्रकाश या विद्यार्थीनीने 84.20% गुण मिळवून तृतिय आली आहे. विद्यालयात 90% च्या पुढे 1 विद्यार्थी तर 75 % च्या पुढे 9 विद्यार्थी , 70% च्या पुढे 10 विद्यार्थी 60% च्या पुढे 18 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या नेत्रदिपक कामगीरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. गोविंद केंद्रे,सचिव विनायक बेंबडे ,मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही ,आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी सर्व दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले, आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!