ग्रामीण भागातून पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी चमकले

उदगीर (एल पी उगिले) तालुक्यातील मौजे तो घरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात राहून देखील आपली बुद्धिमत्ता दाखवून दिली आहे.
२०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 84.82% लागला आहे. 21विद्यार्थी हे विशेषप्राविन्यासह उत्तीर्ण झाले असून विद्यालयातून सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी हे प्रथम , द्वितीय , व तृतीय क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
विद्यालयातून प्रथम .साक्षी सुनील बिरादार 96%,द्वितीय. माहिन दिलदार सौदागर 92.40%, तृतीय श्रद्धा बालाजी गायकवाड 87.40% हे आले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे श्री कलेश्वर ज्ञानप्रसारक भगिनी मंडळ तोगरी या संस्थेचे सचिव श्रीमती इंदुमतीताई येरनाळे , अध्यक्षा शांतम्मा पाटील ,कार्याध्यक्ष महेश येरनाळे, विद्यालयाच्या प्राचार्या सौ वंदना येरनाळे, उपप्राचार्य गुणवंत काळगापुरे, पर्यवेक्षक लक्ष्मण लोभाजी व केंद्रसंचालक नागय्या गुरुस्थळे व विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.