समता नगर येथील नाल्या व रस्त्याचे काम तात्काळ चालू करा अन्यथा आंदोलन
उदगीर (एल पी उगिले) येथील समता नगर परिसर विकासापासून कोसो दूर आहे. विशेषतः या परिसरातील इब्राहिम मज्जिदच्या आजूबाजूच्या सर्व रस्ते व नाल्याचे कामे गेल्या 30 वर्षापासून रखडले गेलेले आहे. हे कामे नगरपालिकेने तात्काळ हाती घ्यावेत, यासाठी नगरपालिकेसमोर बहुजन विकास अभियानाच्या वतीने प्रचंड असे हल्लाबोल आंदोलन करून, येथील नागरिकांना वनवासातून बाहेर काढा, अशा घोषणा देण्यात आल्या. जर नगरपालिकेने तात्काळ निर्णय घेऊन, या रस्त्याचे कामे पावसाळ्या अगोदर चालू करावे,नाही केली तर पुढील आंदोलन कुलूप ठोको आंदोलन असणार असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. घोषणाबाजी करून, पूर्ण परिसर दुमदुमून सोडले होते.
यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, शिवाजी मामा करकाळे, रवी डोंगरे, अमोल सूर्यवंशी, प्रशांत पाटील, यावर खान, किशोर बलांडे, नरसिंग गोखले, पप्पू शेलारकर, गोरख वाघमारे, गंगाधर शेवाळे, बालाजी गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, बाबा पठाण, विजय आलोरे, समतानगर येथील माजी पोलीस अधिकारी शेख इत्यादी सह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
