संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा
उदगीर (एल.पी. उगिले ) येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात करण्यात आला. यावेळी जिजाऊ वंदना घेण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मानाचा मुजरा करण्यात आला. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय आशा घोषणांनी उदगीर नगरीतील परिसर दुमदुमून गेला. आत्तापर्यंतचे संभाजी ब्रिगेडचे कार्य खूप मोलाचे ठरले असून संभाजी ब्रिगेडने समाजावर एक आगळावेगळया प्रकारची छाप टाकली असून सर्व स्तरातून संभाजी ब्रिगेड म्हणजे एक तलवारीची धार असून आता समाज व अधिकारी वर्ग संभाजी ब्रिगेडला एक आशेचे किरण म्हणून पहात आहेत. संभाजी ब्रिगेडकडून समाजाला खूप काही अपेक्षा आहेत. प्रत्येक महामानवाच्या जयंतीला आगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या कार्यातून भेट देणारा संभाजी ब्रिगेडने देश धर्म आणि स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य छत्रपती संभाजी राजांचा जन्मोत्सव अगदी आनंदाने साजरा केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने ,संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमरावजी फड ,जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा ,जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर, जिल्हा सहसचिव शिवश्री व्यंकट थोरे, जिल्हा संघटक शिवश्री सय्यद महेबुब एक धडाडीचा कार्यशील असा संभाजी ब्रिगेडचा उदगीर तालुकाध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, तालुका सचिव शिवश्री सावन तोरणेकर ,तालुका सहसचिव शिवश्री दीपक गायकवाड, शिवश्री सुरज आटोळकर ,शिवश्री आशिष हुरसनाळे ,शिवश्री विकास भंडे, शिवश्री अजय फुले ,शिवश्री विश्वनाथ बिरादार ,शिवश्री पांडुरंग बिरादार ,शिवश्री श्रीपती बिरादार, शिवश्री लक्ष्मण बिरादार ,शिवश्री विजय बिरादार, शिवश्री नागनाथ राजुरे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री प्रदीप ढगे ,शिवश्री सुरज माने ,शिवश्री किरण इत्यादी उपस्थित होते.
