संदीप पवार प्रहारच्या प्रथम पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संदीप पवार यांना, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान 2025 अंतर्गत राज्यांमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
सोलापूर येथे झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या विभागीय मेळाव्यामध्ये उदगीर तालुका उपाध्यक्ष संदीप गुरुनाथ पवार यांनी गेली पाच वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक आणि उपेक्षितांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच शेतकरी आणि दिव्यांग मजूर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत, राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा बाळासाहेब ठाकरे पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्या पुरस्काराचे वितरण सोलापूर येथील मेळाव्यामध्ये करण्यात आले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश आणि विभागीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.