शाहू विद्यालय, शेळगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

0
शाहू विद्यालय, शेळगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

उदगीर (प्रतिनिधी): येथिल किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित शाहू विद्यालय, शेळगाव ही ग्रामीण भागातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. या विद्यालयात सन २००५ – २००६ मध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जवळपास वीस वर्षांनंतर एकत्र येत माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा स्नेहमेळावा नुकताच आयोजित केला.” एक दिवसाची शाळा शिकू या, पुन्हा लहान होवू या…!”
या मेळाव्याला शैक्षणिक वर्ष २००५ – २००६ मधील दहावीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या हे सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. बी.हाके होते. प्रमुख पाहुणे सुरेश पाटील आणि संस्थेसाठी जमीन दान करणारे अ‍ॅड. माधवराव पाटील यांची उपस्थिती लाभली होती. गावातील प्रतिष्ठित पत्रकार राजकुमार जगताप,पंढरीनाथ लांडगे, मोरे , स्काऊट मास्टर बालाजी सुगावे आणि एकनाथ गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमात यावर्षीच्या दहावीच्या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यालय व मुख्याध्यापक यांचे अभिनंदन करण्यात आले. याशिवाय, गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. संगमेश्वर हिंगणे (प्रथम), प्रथमेश सोनकांबळे (द्वितीय) व लामदाडे स्नेहा (तृतीय), यांचा दहावी परीक्षेतील यशाबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी नागनाथ चवळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. दिनकर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारुती बदनाळे, सचिन वाडकर, संगमेश्वर हवा, मीरा सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यालयातील सर्व विद्यार्थी व एकूण ६० माजी विद्यार्थी तसेच प्रतिष्ठीत नागरिक, युवक, युवती उपस्थित होते. स्नेह मेळावा आयोजित केल्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!