जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदी सुनिल हावा यांची निवड

0
जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदी सुनिल हावा यांची निवड

उदगीर (एल पी उगिले) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव रत्न चे संपादक यांच्या सामाजिक आणि पत्रकारितेतील कार्याची दखल घेऊन लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी सुनिल बस्वराज हावा यांची निवड करण्यात आली आहे.
लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष नरसिंह पांडुरंग घोणे यांनी लातूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सदरील निवडीची घोषणा कें केली.यावेळी संस्थेचे सचिव पंडित हनुमंते,अभय मिरजकर,महादेव कुंभार,वामन पाठक,मुरलिधर चेंगटे, संजय स्वामी, संगमेश्वर जनगावे,संगम पटवारी यांच्या सह गायत्री बिल्डकाँन एल.एल.पी चे सागर पत्की व संतोष सोनी उपस्थित होते.याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष नरसिंह घोणे यांच्या हस्ते सुनील हावा यांचा सत्कार करण्यात आला.
सुनील हावा यांच्या निवडी बद्दल उदगीर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!