रोटरी क्लबच्या वतीने आयोजित सर्वरोग निदान व तपासणी शिबिर

उदगीर (एल पी उगिले) येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने सामान्य रुग्णालयात आरोग्य आपल्या दारी उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबिरास गरजू रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जवळपास 1500 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे नियोजित प्रांतपाल रो. सुधीर जी लातूरे, अतिरिक्त जिल्हा व शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक पांडुरंग दोडके, डॉ. दत्तात्रय पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी मोनिका पाटील, डॉ. नागेश स्वामी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. दत्तात्रय पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना तहसीलदार राम बोरगावकर यांनी रोटरी क्लब नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवित असते. या सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबिरामुळे सामान्य गरजू रुग्णांची सोय झाली असल्याचे मत व्यक्त केले.
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब या आजारासह अन्य विविध आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या शिबिरात तब्बल 1500 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. संगमेश्वर दाचावार, डॉ. विजयकुमार केंद्रे, डॉ. विजयकुमार बिराजदार, डॉ. मोहन वाघमारे, डॉ. संजय चिल्लरगे, डॉ. संतोष पांचाळ, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. संतोष बिरादार, डॉ. योगेश बिरादार, डॉ. बस्वराज स्वामी, डॉ. राणी पवार, डॉ. सुषमा कोगे, डॉ. स्वाती सोनवणे यांच्यासह अन्य डॉक्टरांनी रुग्णांना सेवा दिली.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन विशाल जैन यांनी केले तर आभार डॉ. दत्तात्रय पाटील यांनी मानले. शिबिरासाठी रोटरी क्लबचे रविंद्र हसरगुंडे, संतोष फुलारी, प्रमोद शेटकार, किशोर पंदिलवार, विशाल तोंडचिरकर, प्रशांत मांगुळकर, रामदास जळकोटे, चंद्रकांत ममदापुरे, व्यंकट कणसे, विक्रम हलकीकर, महानंदा सोनटक्के, मंगल विश्वनाथे, बजरंग चंदनशिवे, प्रवीण चंडेगावे, अनिल मुळे, ॲड. मंगेश साबणे, गजानन चिद्रेवार, ज्योती स्वामी सह अनेकांनी पुढाकार घेतला.