शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमात उदगीर महसूल विभाग मराठवाड्यात दुसरा

0
शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमात उदगीर महसूल विभाग मराठवाड्यात दुसरा

उदगीर (एल.पी.उगिले)
जनतेच्या सेवेसाठी तात्काळ सेवा उपलब्धता व्हावी, या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे उदगीर उपविभागीय कार्यालय द्वितीय क्रमांकावर आले असून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिकृत पत्रकारान्वये कळविण्यात आले आहे की, उदगीर येथील उपविभागीय कार्यालयामध्ये मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नागरिकांना सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने विशेष कार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शना खाली कृती आराखडा राबवण्यात आलेला असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संदर्भाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून उपविभागीय कार्यालय उदगीर आणि तहसील कार्यालय उदगीर येथील प्रत्येक विभागाला भेट दिली. कार्यालयामध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांचे नाम फलक व त्यांच्याकडे असलेल्या स्थापने विषयीच्या कामकाजाचा उल्लेख असलेला कार्यपटल तसेच अभ्यंगताना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, दिशादर्शक फलके, स्वच्छता गृह, महिलांसाठी हिरकणी कक्ष कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अर्ज किंवा निवेदन लिहिण्यासाठी लेखन फळी, कार्यालयात अभिलेखाचे निंदनीकरण करून त्यानुसार अभिलेखे अद्यावती करण करण्यात आले आहे. नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारपेटी, महिलांसाठी विशाखा पेटी व सूचनापेटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दर आठवड्याच्या सोमवारी सदरील पेटीतील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई अनुसरण्यात येत असल्याचेही पाहिले. सदरच्या सर्व सुविधा या आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटने कडून ठरविण्यात आलेल्या मानकानुसार रचना करून तपासणी करण्यात आली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर व तहसील कार्यालय उदगीरला आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटने कडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सदरच्या कामकाजाची तसेच शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीरने छत्रपती संभाजी नगर विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उपविभागीय अधिकारी उदगीर चे सुशांत शिंदे व सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!