उदगीरात रोटरीच्या वतीने गरजुंना मिळणार अल्पदरात डायलीसिसची सुविधा

0
उदगीरात रोटरीच्या वतीने गरजुंना मिळणार अल्पदरात डायलीसिसची सुविधा

नारायणा ऍग्रो ऑइल प्रा. ली.च्या सीएसआर फंडातून उभारला प्रकल्प

उदगीर : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने साई हॉस्पिटल येथे डायलीसिस करण्यासाठी मशीनरी उपलब्ध करून देण्यात आली असून गरजू रुग्णांना अल्पदरात ही सुविधा देण्यात येणार आहे. शहरातील नारायणा ऍग्रो ऑइल प्रा लि. च्या सिएसआर च्या फंडातून ही योजना कार्यान्वित झाली आहे.
गुरुवारी या डायलिसिस युनिटचा शुभारंभ रोटरी क्लब ३१३२ चे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
नारायणा ऍग्रो ऑइल प्रा लि. ने दिलेल्या तब्बल २० लाख ६० हजार रुपयांच्या सी एस आर फंडातून डायलीसिस करण्यासाठी तीन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून साई हॉस्पिटलचे संचालक डॉ. माधव चंबूले यांच्या निगराणीखाली ही सुविधा गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या मशीनच्या शुभारंभ प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, डॉ. माधव चंबूले, डॉ. रमण रेड्डी, नारायणा ऍग्रोचे संचालक सागर महाजन, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन प्रशांत मांगुळकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. साबू यांनी, उदगीरच्या रोटरी क्लबने हाती घेतलेला हा आरोग्य विषयक प्रकल्प अतिशय स्तुत्य असून या प्रकल्पामुळे अनेक गरजू रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचे म्हणाले. डॉ. माधव चंबूले यांनी, रोटरीने पुढाकार घेऊन हा प्रकल्प सुरु केला त्याबद्दल रोटरी परिवाराचे कौतुक करून या प्रकल्पाचा अधिकाधिक गरजू रुग्णांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विशाल जैन यांनी केले तर आभार विक्रम हलकीकर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी साई हॉस्पिटलचे मीरा चंबूले, डॉ. सुशील चंबूले, डॉ. पूजा चंबूले, डॉ. लक्ष्मण डोकाडे यांच्यासह रोटरी क्लबचे उपाध्यक्ष रविंद्र हसरगुंडे, प्रमोद शेटकार, विजयकुमार पारसेवार, महानंदा सोनटक्के, मंगला विश्वनाथे, संतोष फुलारी, चंद्रकांत ममदापुरे, व्यंकट कणसे, डॉ. संतोष पांचाळ, डॉ. सुधीर जाधव, प्राचार्य सुधीर जगताप, अनिल मुळे, बजरंग चंदनशिवे, प्रवीण चंडेगावे, मोतीलाल डोईजोडे, अभिजित पटवारी, मनोज खत्री, ज्योती स्वामी, गणेश तोलसरवाड, डॉ. शैलेश येरोळकर, डॉ. नितीन गुरुडे, डॉ. देशमुख, डॉ. धनाजी कुमठेकर, बबन हैबतपुरे, सुबोध आंबेसंगे व अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!