उदगीर तालुक्यातील तोगरी परिसरातून सहा लाखाहून अधिक किमतीचा गांजा जप्त

उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील मौजे तोगरी परिसरातून देवणी पोलिसांनी सहा लाख दहा हजार रुपये किमतीचा जवळपास 61 किलो गांजा पकडला आहे. तसेच संशयित आरोपी असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअंतर्गत देवणी पोलीस ठाण्यांतर्गत तोगरी शेत शिवारात देवणी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मोठी कारवाई करत तोगरी शिवारात एका शेतातून 6 लाख 10 हजार रुपयांचा लागवड करण्यात आलेला गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
देवणी तालुक्यातील तोगरी शेत शिवारात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याअधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वातील पथकाने तोगरी शिवारातील गंगाराम हाकू चव्हाण यांच्या शेतात छापा टाकून गांजाची 61 किलो वजनाची 28 झाडे जप्त केली आहेत, या प्रकरणी पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक
गंगाराम हाकू चव्हाण, संतोष गंगाराम चव्हाण, (दोघे रा. तोगरी ,ता. उदगीर जिल्हा लातूर).यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वात सहभागी अधिकारी अमलदार सपोनी डोके, पोलिस उपनिरीक्षक गोंड, पोलिस उपनिरीक्षक वराडे,पोलिस उपनिरीक्षक डफडवाड, पोलिस अमलदार कोंडामंगले, कलवले, गुणाले, डोईजोडे, कुरे, शटकार, बिरादार यांनी केली आहे.