उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांचा पोलीस पाटील संघटने तर्फे सत्कार

0
उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांचा पोलीस पाटील संघटने तर्फे सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) येथील
उपविभागीय कार्यालय येथे उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे यांचा उदगीर तालुका पोलीस पाटील संघटने तर्फे शॉल व बुके देऊन सत्कार करण्यात आला,
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून 100 दिवसाचा कृतिआराखडा कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात उदगीर उपविभागिय कार्यालयाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे यांचा सत्कार पोलीस पाटील संघटने तर्फे करण्यात आला. या वेळी लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. ज्योतीताई बिरादार, लातूर जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव नरले पाटील,उदगीर तालुका अध्यक्ष धनराज तौर पाटील,तालुका सचिव अंकुश वाघे पाटील, तालुका संघटक प्रमोद मद्देवाड पाटील, ज्येष्ठ पोलीस पाटील मिलिंद वाघमारे पाटील, भरतराव बिरादार उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी उपस्थित पोलीस पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. गाव पातळीवर पीक पाण्यासोबतच कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातही विचारपूस केली. तसेच सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!