पोलीस पाटील संघटने कडून भगवानदादा पाटील तळेगावकर व भरत चामले यांचा सत्कार संपन्न.

0
पोलीस पाटील संघटने कडून भगवानदादा पाटील तळेगावकर व भरत चामले यांचा सत्कार संपन्न.

उदगीर (एल पी उगिले) येथील
स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ उदगीर च्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पॅनल बिनविरोध निवडून आल्याने, लातूर जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेकडून सत्कार करण्यात आला.पॅनलचे प्रमुख,लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर भगवानदादा पाटील तळेगावकर यांचा व खरेदी विक्री संघाचे नूतन संचालक, विद्यमान चेअरमन भरत भाऊ चामले यांचा संघटने कडून सत्कार करण्यात आला. भाऊसाहेब सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील ,उदगीर तालुकाध्यक्ष धनराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव नरले पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती बिरादार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रशेखर गव्हाने पाटील , भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हनमंत शेळके पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!