“उदगीर नगरपरिषद कार्यलया द्वारे तिरंगा मोटरसायकल रॅली संपन्न.”

0
“उदगीर नगरपरिषद कार्यलया द्वारे तिरंगा मोटरसायकल रॅली संपन्न.”

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर नगरपरिषद कार्यालयाद्वारे मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तसेच जागतिक दहशतवादी व हिंसाचार विरुद्ध दिन याचे औचित्य साधून तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांना दहशतवादी व हिंसाचार विरुद्ध दिन शपथ शुभम मटके यांनी दिली.सदर रॅलीची सुरुवात उदगीर नगरपरिषद कार्यालय येथून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले. यावेळी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, तहसीलदार राम बोरगावकर, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. रॅलीचा मार्ग उदगीर नगरपरिषद कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कॅप्टन कृष्णकांत चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक ते हुतात्मा स्मारक ते उदगीर नगरपरिषद कार्यालय असा होता.
या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे रॅलीमध्ये सुरवातीस अग्निशमनच्या मोटरसायकल, त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, तहसीलदार राम बोरगावकर, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मोटरसायकल, नंतर महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या मोटरसायकल, त्यानंतर पुरुष अधिकारी, कर्मचारी यांच्या मोटरसायकल व त्यानंतर अग्निशमन गाडी रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
या रॅलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी महेश शिंदे, आस्थापना विभाग प्रमुख संदिप कानमंदे, शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!