मौजे नागलगाव येथे कृषी संकल्प अभियान संपन्न

0
मौजे नागलगाव येथे कृषी संकल्प अभियान संपन्न

उदगीर (एल पी उगिले) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर यांचे मार्फत कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा विकसित कृषि संकल्प अभियान दिनांक 4 जून 2025 रोजी उन्नत भारत अभियान अंतर्गत दत्तक गाव नागलगाव येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. सदर अभियान हे खरीप पूर्व शेती व पशुधन व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरिता कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे निर्देशानूसार 29 मे ते 12 जून दरम्यान भारतभर आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोककुमार देवंगरे यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी नाबदे तसेच सुभाष राठोड सरपंच नागलगाव हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अशोक भोसले (पशुधनामधील रेबिज रोग), डॉ. एम. रजिउद्दीन (दुधाचे दैनंदिन आहारातील महत्व),डॉ. राम कुलकर्णी (मानवी आहारातील अंड्याचे महत्व ), डॉ. पी. व्ही. पाटील (पशुधनातील लसीकरण आणि जंतनिर्मूलण तथा वैरण लागवड) व नाबदे (मृदा तपासणी, बिज निवड त्यावरील बिज प्रक्रिया व खते व्यवस्थापन) या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. सदर अभियानाचा १०० पेक्षा जास्त शेतकरी व पशुपालक यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत मसारे समन्वयक उन्नत भारत अभियान तसेच सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन डॉ. विवेक खंडाईत नोडल अधिकारी उन्नत भारत अभियान नागलगाव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी, रमेश बिरादर, नागनाथ सोमवंशी, योगेश भाटकुळे, ग्रामपंचायत सदस्य, सेवक तसेच गावकरी मंडळी याचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!