धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

0
धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

उदगीर(एल.पी.उगीले) :- येथील धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ.सायराम श्रीगिरे,डॉ.रविकांत पाटील,डॉ.प्राजक्ता जगताप, डॉ.स्नेहल पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात द्रव्यगुण विभागप्रमुख डॉ.सायराम श्रीगिरे यांनी वनऔषधी लागवडीची तांत्रिक माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना डॉ.दत्तात्रय पाटील यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी व जमिनीची धूप नियंत्रित करण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून भविष्यामध्ये आधुनिक औषधांच्या किंमती खूपच वाढणार असल्याने नागरिकांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी व आवश्यकतेनुसार विविध आजारा मध्ये उपयोग करण्यासाठी अल्प दरात उपलब्ध होणाऱ्या जीवनावश्यक वनऔषधीची लागवड मोठया प्रमाणावर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिवकुमार मरतूळे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.श्रुती तिवारी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.शिवानी पाटील,डॉ.केतकी तरडे,बालाजी सूर्यवंशी,विनायक काळे,गणेश नावंदीकर यांचे सहकार्य लाभले.याप्रसंगी महाविद्यालयातील डॉक्टर्स,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!