शिवराज्याभिषेक दिनाचे औचित साधून संभाजी ब्रिगेडने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन

0
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित साधून संभाजी ब्रिगेडने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन

उदगीर (एल पी उगिले) शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडने गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार 2025 आयोजित केला आहे. दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा आयोजित करून संभाजी ब्रिगेडकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. , गुणवंताचे कौतुक आणि त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे असे संयोजन समितीने कळविले आहे. संभाजी ब्रिगेड समाजसेवेच्या कार्यात असो किंवा अन्यायाच्या विरोधात असो लढ्यामध्ये अग्रेसर असून प्रत्येक महापुरुषाची, महामानवाच्या जयंतीला वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला खिचडी, पाणी, फळे वाटप केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला प्रत्येक जयंतीच्या अध्यक्षाला ट्रॉफी व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले .महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त रक्तदान व सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. तर छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त टी-शर्ट वाटप, रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. राजमाता मां जिजाऊ जयंती निमित्त सखी कार्यक्रम घेण्यात आला. गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नात साहित्य देऊन प्रत्येक वेळी असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे कार्य उल्लेखनीय असून, किल्ले रायगड शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडने गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार सोहळा 2025 आयोजित केला आहे .या कार्यक्रमालाचे अध्यक्ष म्हणून उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर राहणार असून प्रमुखप पाहुणे पो. नि. राजकुमार पुजारी, प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड उमाकांत उफाडे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष प्रदीप ढगे ,समर्पण करिअर इन्स्टिट्यूट संचालक प्रा.डॉ. अविनाश प्रभुराव पाटील,प्रा.डॉ. सुनिल यशवंतराव ढगे, प्रा.डॉ. पांडुरंग बालाजी फड, प्रा.विकास प्रभुराव पाटील, योगाचार्य रामचंद्र गरड तर कार्यक्रमाचे संयोजक संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार माने ,जिल्हा सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा, संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष उत्तमजी फड, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर ,जिल्हा संघटक मेहबूब सय्यद, जिल्हा संघटक राम रावणगावे ,जिल्हा सहसचिव व्यंकट थोरे ,जिल्हा उपाध्यक्ष विकास भंडे, तालुका अध्यक्ष राजकुमार भालेराव, तालुका उपाध्यक्ष धम्मसागर सोमवंशी ,तालुका सचिव सावन तोरणेकर ,सर्कल प्रमुख आशिष हुरसनाळे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या संधीचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थित नोंदवावी. असे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!