सर्वसामान्याला शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध – राम बोरगावकर

0
सर्वसामान्याला शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध - राम बोरगावकर

उदगीर (एल पी उगिले) :- उदगीर तालुक्यातील भाकसखेडा येथे ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच अर्चना खेडकर या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उदगीर चे तहसीलदार राम बोरगावकर हे उपस्थित होते. आपले विचार मांडताना त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य पर्यंत शासकीय योजना निकषात बसणारे पात्र लाभार्थी यांना कसे मिळतील, याकडे ग्रामीण भागात काम करणारे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी लक्ष देऊन त्यांना लाभ कसा मिळेल या बाबीची पूर्तता करावी. कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. कारण आम्ही योजनेचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाकसखेडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी घरकुल असो किंवा कृषी च्या विविध योजना असो, नरेगा स्वच्छ भारत मिशन, पशुसंवर्धन तसेच वैयक्तिक लाभाचे अनेक प्रकल्प शासनाचे असून जनतेने त्याचा परिपूर्ण लाभ घ्यावा, असे सांगितले.ग्रामीण भागातील जी यंत्रणा आहे त्यांनी यासाठी काम करावे असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील शेतकरी यांनी ॲग्री स्टॅग मध्ये भाग घेऊन शंभर टक्के आपले सर्व शेतकरी खातेदार फार्मर आयडी काढून घ्यावेत, अन्यथा यापुढे शासनाच्या संपूर्ण योजना मिळणार नाहीत. त्यासाठी ॲग्री स्टॅग करणे जरुरीचे आहे. असे राम बोरगावकर यांनी सांगितले.
ग्राम दरबाराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय भाकसखेडा यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी सुरेखा नामवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका जाधव, विस्तार अधिकारी पंचायत अंकुश बिरादार, विस्तार अधिकारी संख्यांची विवेक स्वामी, विस्तार अधिकारी कृषी विजयकुमार अजने, बालाजी भांगे विस्तार अधिकारी आरोग्य मनोहर जाधव, विस्तार अधिकारी स्वच्छ भारत मिशन भागवत टेकाळे, अभियंता बालाजी जाधव, कृषी सहाय्यक मोरे, ग्रामसेवक नरेंद्र पांचाळ, महिला व बालकल्याण च्या प्रतिनिधी पृथ्वी कंठे, घरकुल तपासणीस किशोर भत्ताडे, नरेगा विभागाचे अविनाश ढवळे, ग्रामसेवक संतोष माचे, भाकसखेडा गावाच्या सरपंच अर्चना खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे ग्रामपंचायत सदस्य गुलाब पठाण, मैनाबाई जाधव, भाग्यश्री जाधव, विजय बुरले, माधव टेकपुंजे, उद्धव कांबळे, नरसिंग जाधव, श्रीधर पाटील, सत्यवान जाधव, भगवंत जाधव, माधव जाधव, विठ्ठल जाधव, दत्ता जाधव, सतीश जाधव, एकनाथ जाधव, त्रिंबक कांबळे, तानाजी जाधव, आनंदराव कांबळे, गोरख कांबळे, नामदेव जाधव, अशोक कांबळे, रंजीता कांबळे, मीरा शिंदे, यांच्या मिरा कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक नरेंद्र पांचाळ यांनी केले. व कृषी सहाय्यक मोरे यांनी उपस्थिताचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!