शिक्षक पतसंस्थेच्या सचिवपदी सर्जेराव भांगे, अध्यक्षपदी नंदकिशोर काळे, उपाध्यक्षपदी भरत निलेवाड.

0
शिक्षक पतसंस्थेच्या सचिवपदी सर्जेराव भांगे, अध्यक्षपदी नंदकिशोर काळे, उपाध्यक्षपदी भरत निलेवाड.

उदगीर (एल पी उगिले) तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या २०२५ ते ३० या पंचवार्षिक निवडणुकीत सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे १२ उमेदवार बहुमताने निवडून आले. पदाधिकारी निवडीच्या वेळी सर्वानुमते चेअरमन म्हणून नंदकिशोर काळे तर उपाध्यक्ष म्हणून भरत निलेवाड, सचिव पदी सर्जेराव भांगे या तिघांची बिनविरोध निवड करण्यात आली. उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची मे महिन्यात निवडणूक ठरली होती. ही निवडणूक लक्षवेधी ठरली. सर्जेराव भांगे यांच्या नेतृत्वाखाली सत्यम शिवम सुंदरम पॅनल व प्रतिस्पर्धी गटाकडून बहुजन विकास पॅनल या दोन पॅनल मध्ये निवडणूक होऊन त्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे १५ पैकी १२ उमेदवार विजयी झाले. तर विरोधकांना ३ जागांवर समाधान मानावे लागले.या निवडणुकीत सर्जेराव भांगे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या पॅनलला पराभूत करण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसली होती. मात्र सर्जेराव भांगे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनलनेच दणदणीत विजय मिळवला, त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. पॅनल प्रमुख सर्जेराव भांगे यांची सचिव पदी फेर निवड झाली. सलग सात वर्षे सचिव पद सांभाळून पतसंस्थेला नावलौकिक मिळवून देणारे सचिव सर्जेराव भांगे यांची पुन्हा एकदा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे अध्यक्षपदी नंदकिशोर काळे, उपाध्यक्षपदी भरत निलेवाड यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!