महेश्वरी समाजातर्फे अनेक कार्यक्रमाने महेश नवमी साजरी,57 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
महेश्वरी समाजातर्फे अनेक कार्यक्रमाने महेश नवमी साजरी,57 रक्तदात्यांनी केले रक्तदान

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर येथे महेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी निमित्याने 130 जनाचे नेत्र तपासणी, सर्व रक्त तपासण्या व 57 लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. नंतर दुधिया हनुमान येथून बाईक रॅली काढण्यात आली. त्यात पांढरे कपडे पुरुषांनी व स्त्रियांनी चुनरी साडी घालून जय महेशची गळ्यात पटी व भगवी टोपी घालून लक्ष्मी नारायण मंदिर येथे 100 पेक्षा जास्त समाज बांधवांनी भाग घेतला होता. लगेच लक्ष्मी नारायण मंदिर येथे आल्यानंतर सर्व मान्यवरांच्या वतीने दीप प्रज्वलन करून, समाजातील ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे अशा 8 जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.
समाजातील गुणवंत विद्यार्थी व विशेष कार्यात यशस्वी झालेले विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. त्यात लातूर येथील महेश्वरी समाजा तर्फे श्रीनिवास सोनी यांना महेश्वरी गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे सत्कार करण्यात आला. जालना येथे महेश मंत्र परिवार तर्फे रामविलास नावंदर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्या बदल सत्कार करण्यात आला. डॉ. स्मिता लखोटीय यांच्या तर्फे महेश वंदना करून कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्र संचालन सौ. किरण लोया यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सौ .संगीता सोनी यांनी केले. ईश्वर प्रसाद बाहेती यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी, सचिव गोपाल मणियार सर्व पदाधिकारी व सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीत पार पडला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!