प्रस्थापितांचे अतिक्रमण गरीबांच्या मुळावर

प्रस्थापितांचे अतिक्रमण गरीबांच्या मुळावर

वस्तीमधुन अगोदर देशी दारु दुकान, ममता बार, किणारा बार काढावे तरच चिकण मटन मच्छी मार्केट हटवावे

छोटया व्यवसायीकांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
देवणी (प्रतिनिधी) : देवणी बस स्थानक लगत कंपाउंड पुर्व बाजुस नाली वरील रोड लगत परीसरात छोटे, श्रमिक, कष्टकरी व्यवसायीक, हातावर पोट असणारे तरकारीवाले, फेरीवाले, हातगाडीवाले, फुल विक्रेते, पानटपरीवाले, चहावाले, बुट चप्पल विक्रीवाले, खिचडीवाले, कटलरीवाले, पाणीपुरीवाले, हेअर सलुनवाले, वडापाववाले, फ्रुटवाले, यासह अनेक, छोटे व्यवसायीक असुन त्यांच्या कुंटुबाचा उदारनिर्वाह सर्व उपजिवीका याच छोट्याशा धंद्यावर अवलंबून असुन यांना ह्या धंद्यावरुण उठवल्यास उपासमारीची वेळ येणार आहे असे निवेदनात नमुद केले आहे. कांही व्यापाऱ्यानी नालीच्या पुढे रोडवरती अतिक्रमण करून दुसरे अनेक गाडे पाणीपुरी,जिलेबी दुकान,पानटपरी बसवुन रोडवरचे भाडे स्वतः दुकानदार दुकान मालक घेतात हे सर्वासमक्ष सत्य आसताना सामाजिक अथवा राजकीय कार्यकर्त्यांनी उपोषण अथवा अंदोलन केलेले नाहीत कारण कि यातील सर्व व्यापारी नातेवाईक, मिञमंडळी लागतात म्हणून हे अतिक्रमणास डोळे झाक करुण प्रस्थापितांच्या अतिक्रमणाला हात लावित नाहीत व आता हे अतिक्रमन गोरगरीबांच्या मुळावर (जिवावर) उठले आहेत तसेच पुर्व बाजुस छोटे व्यवसायीकावर अतिप्रसंग अन्याय होत आहे. हनुमान मंदिर जाणाऱ्या रोडवर देशी दारु दुकान, किनारा बार, ममता बार, मटका तितली खेळ यांची गर्दी खुप आहे चिकनच्या गर्दीच्या नावाने यांना नोटीसा देऊन अतिक्रमन हटवुन उपासमारीची वेळ या छोट्या व्यवसायीकावर आणण्याचे क्षडयंञ रचले जात आहेत तरी अगोदर प्रस्थापितांचे अतिक्रमण काढावे, तसेच देशी दारु दुकान, ममता बार, किनार बार, हे गावातुन वस्तीतुन बाहेर काढावे नंतर चिकन, मटन, मच्छी मार्केट हटवावे अतिक्रमण नोटीसास स्थगती देण्यात यावे आमचे वैयक्तिक अतिक्रमन हटवल्यास आम्ही सर्व कुटुंबासह नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह / अमरण उपोषण करण्याचा इशारा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार देवणी, जिल्हाधिकारी लातुर, उपजिल्हाधिकारी नीलंगा, देवणी पोलिस ठाणे, नगरपंचायत कार्यालय देवणी, यांना श्रमीक हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे या निवेदनावर पांडुरंग कदम,दशरथ कांबळे, राजकुमार गायकवाड, गोपाळ निरुडे, बालाजी निरुडे, नरसिंग लातुरे, सलिम शेख, अखील मल्लेवाले, अलिम मल्लेवाले, शकिल मल्लेवाले, दत्ता तपसाळे, माजीत डोनगावे, शिवाजी तपासे, जब्बार सय्यद, इस्माईल जानापुरे, इब्राहिम बागवान, प्रकाश सुर्यवंशी, प्रभाकर वाघमारे, युनुस मनियार, वहीद काझी, आकबर शेख, फेरोज शेख, रुकमिनबाई थोरे यांच्या सह अनेकांच्या स्वक्ष-या आहेत.

About The Author