शक्‍तीकेंद्र प्रमुखांनी पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडावी

शक्‍तीकेंद्र प्रमुखांनी पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडावी

लातूर ग्रामीण विधानसभा शक्‍तीकेंद्र प्रमुखाच्‍या बैठकीत आ. रमेशअप्‍पा कराड

लातूर (प्रतिनिधी) : सर्वत्र भाजपाचे समर्थ बुथ अभियान सुरू असून राज्‍यात लातूर जिल्‍हा भाजपाचा बालेकिल्‍ला सिध्‍द करण्‍यासाठी शक्‍तीकेंद्र प्रमुखांनी पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडावी आणि प्रत्‍येक बुथ भाजपाचे सशक्‍त बुथ निर्माण करावे असे अवाहन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केले आहे. भाजपाचा समर्थ बुथ अभियान अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शक्‍तीकेंद्र प्रमुखांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना आ. रमेशअप्‍पा कराड यांनी वरील अवाहन केले. या बैठकीत भाजपाचे मराठवाडा विभागाचे संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्‍हा बुथ समन्‍वयक तुकाराम गोरे, जिल्‍हा भाजपाचे प्रा. विजय क्षीरसागर, किसान आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, भाजपाचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष हणुमंतबापू नागटिळक, अनिल भिसे, भाजपाचे रेणापूर तालुकाध्‍यक्ष अॅड. दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्‍यक्ष बन्‍सी भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रत्‍येक शक्‍तीकेंद्र प्रमुखाच्‍या कामाचा आढावा घेण्‍यात आला.

यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशातील गोरगरीब सर्वसामान्‍यासाठी सुरू केलेल्‍या विविध योजनेमुळे त्‍यांच्‍या कामामुळे आणि धाडसी निर्णयामुळे जनतेत भाजपाबाबत विश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वातील भाजपाच्‍या राज्‍यशासनाने केलेली कामे आणि गेल्‍या दिड दोन वर्षातील महाविकास आघाडी सरकारची कामे याची तुलना ग्रामीण भागातून होत आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्‍या या ठाकरे सरकारवर कोणीही समाधानी नाही. प्रामाणीकपणे काम केले तर त्‍याचे निश्चितपण फळ मिळतेच असे सांगून आ. कराड म्‍हणाले की, कार्यकर्त्‍यांनी प्रचंड मेहनत घेवून लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपाचे काम उभे केले असताना अचानकपणे गेल्‍या विधानसभा निवडणूकीत लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला देण्‍यात आली.

यामुळे कार्यकर्त्‍यात निराशा येणे साहजीक आहे. केलेल्‍या कामाची दखल घेवून पक्षश्रेष्‍ठीने आपल्‍याला जिल्‍हाध्‍यक्ष म्‍हणून काम करण्‍याची जबाबदारी दिली. त्‍याचबरोबर विधानभवनात काम करण्‍याची संधी दिली खऱ्या अर्थाने कार्यकर्त्‍यांच्‍या कष्‍टाला पक्षाने न्‍याय दिला. पक्ष योग्‍य वेळी योग्‍य संधी देत असतो. आपल्‍यामुळे पक्ष नाही तर पक्षामुळे आपण आहोत याची जाणीव ठेवून कार्यकर्त्‍यांनी सतत कार्यरत असले पाहिजे.

समर्थ बुथ अभियानाच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक बुथ मजबुत झाले पाहिजे. येणाऱ्या काळात जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदी कार्यकर्त्‍याच्‍या निवडणूकीसाठी हे अभियान महत्‍वपुर्ण ठरणारे आहे. तेव्‍हा कार्यकर्त्‍यांनी पक्षकामाच्‍या माध्‍यमातून जनतेच्‍या सतत संपर्कात रहीले पाहिजे असेही आवाहन आ. कराड यांनी केले. भाजपाचे प्रेरणास्‍त्रोत डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्‍या जयंतीपासून ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या वाढदिवसापर्यंत भाजपाच्‍या वतीने देशभर समर्थ बुथ अभियान राबविले जात असल्‍याची माहिती देवून यावे बोलताना सहसंघटनमंत्री संजय कौडगे म्‍हणाले की, शक्‍तीकेंद्र प्रमुख आणि बुथ प्रमुखांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि इमानदारीने पुर्ण केली तर कोणत्‍याच निवडणूकीत आपल्‍याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही.

यावेळी जिल्‍हयाचे बुथ समन्‍वयक तुकाराम गोरे यांनी अनेक महत्‍वपुर्ण सुचना केल्‍या. भाजपाचे रेणापूर तालुकाध्‍यक्ष अॅड. दशरथ सरवदे यांनी बैठकीचे प्रास्‍ताविक केले. या बैठकीचे सुत्रसंचलन दिलीप पाटील यांनी केले. या बैठकीस लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रेणापूर आणि लातूर तालुक्‍यासह औसा तालुक्‍यातील भादा सर्कल मधील शक्‍तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

About The Author