ग्रामसेवक असुन मोलंबा; नसुन खोळंबा!
तोंडार (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील तोंडार गाव हे दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील ग्रामपंचायत सदस्य संख्या ही 13 व सरपंच पद जनसामान्यांतुन निवडुन आलेले आहेत. गावातील अनेक प्रश्न निर्माण होत असताना ग्रामसेवक मात्र असुन मोलंबा; अन् नसून खोळंबा! अशी स्थिती झाल्याने तोंडार ग्राम पंचायत सदस्य सह नागरिकांतुन ही नाराजीचा सूर दिसुन येत आहे. उदगीर तालुक्यातील तोंडार हे एक प्रगत गाव असुन गाव मोठे असल्याने गावात अनेक समस्यां उद्भवत असतात. त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी ग्रामस्थ पंचायत ची पायरी गाठतात, किवा आपल्या निवडून आलेल्या लोक नियुक्त सदस्य चा समोर आपली समस्या माडतात, व ति समस्या संबंधित ग्राम सेवक समोर मांडली असता, ते कसल्याही प्रकारची कार्यवाई किवा समस्याचा निपटारा करत नसतात, व ते गावात आपल्या कर्तव्यावर कधी येतात व कधी जातात, हे नागरिकाना काय सदस्याना ही कलत नाही! आज गावात अनेक लाईट खांबावर बल्ब नाहीत, पावसाळ्याचा दिवस असलयाने अनेक लहान मोठ्या नाल्या तुबुन आहेत, अनेक गल्लीबोळात रस्ता नसल्याने त्या ठिकाणी चिखलाचे स्वरुप झाले आहे. तिथ खडक टाकणे गरजेचे आहे, सध्यसथित कुमठा (खु) च्या माळावरून पाणी गावात येते ते जि.प.शाळेपासून नाला नसल्याने ते पुर्ण पाणी बसवेश्वर चौकात रस्त्यावरुन वहात आहे. सर्वात मोठी समस्या विकाराबाद ते परली रेल्वे लोहमार्ग तोंडार मधून गेला आहे त्या लोहमार्ग वर गेट नं.86 येथे तीन वर्ष पुर्वी भुयारी मार्ग बांधुन वाहणधारकाची होणारी हेळसांड दुर केली, परंतु हे भुयारी मार्गात सखोल पाणी साचत असल्याने कमरेवर पाणी जमा होत आहे, व रात्री बे रात्री पाऊस झाला की उदगीर ते चाकुर तालुक्यातील वाहणधारक ईतर कोसोदुर मार्गावरून जावे लागत असल्याने तोंडार ग्राम पंचायत व कुमठा खु चा ग्राम पंचायत ने रेल्वे प्रशासनास हे पाणि कायम हटविण्यासाठी निवेदन सादर केले आहे, व ते निवेदन काल दि: 25 /7/21 रोजी राज्याचे राज्यमंत्रि संजय बनसोडे यांना ही निवेदन सादर करण्यात येणार होते, परंतु संबंधित ग्राम सेवकाचा स्वाक्षरीसाठी पत्रकार संदीप बी.पाटील यांनी चार वेला फोन केला, परंतु ग्राम सेवक आपला फोन उचलला नाही, व आजतागायत परत सुद्धा फोन केला नसल्याने ते निवेदन जशाच तसे राहिले अशा अशा हलगर्जी पणा मुळे ग्राम सेवक चा कर्तव्यावर ग्राम पंचायत सह गावपातळीवरील नागरीक नाराजी व्यक्त करीत असल्याने लवकरच संबंधित उदगीर चे गटविकास अधिकारी महेश सुले साहेब यानी या ग्राम सेवक ची कानुउघडणी करुन जनतेचा समस्याचे निराकरण करण्याची समज द्यावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य सह नागरिकांतुन होत आहे.