पोलीस फ्लॅश न्युज वृत्तपत्र समुहाकडून दिवंगत बाबन आत्तार (पत्रकार लोकमत) यांच्या कुटुंबीयांना ११ हजार रूपयांची आर्थिक मदत

पोलीस फ्लॅश न्युज वृत्तपत्र समुहाकडून दिवंगत बाबन आत्तार (पत्रकार लोकमत) यांच्या कुटुंबीयांना ११ हजार रूपयांची आर्थिक मदत

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रोकडा सावरगांव येथील दै लोकमत प्रतिनिधि तथा लातुर जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य पत्रकार प्रा. बाबन आत्तार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले असुन त्यांच्या पश्चात पत्नी आणी दोन लहान मुले आहेत त्यांची सध्या हालाखीची परिस्थिती असल्यामुळे पोलीस फ्लॅश न्युज संपादक तथा लातुर जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य गणेश होळे परिवाराकडून एक छोटीसी ११००० हजार रूपयांची आर्थिक मदत पत्रकार बाबन आत्तार यांच्या कुंटूंबीयांना त्यांच्या सासरवाडी नाव्हा ता पालम जि परभणी येथे जाऊन पोलीस फ्लॅश न्युज तालुका प्रतिनिधि गोविंद काळे यांच्या हस्ते इम्रान, जावेद या दोन लहान चिमुकल्यांना दिली यावेळी पत्रकार दै.लोकमत तालुका प्रतिनिधि अहमदपूर सय्यद सलिम ,सरदार पटेल सर, आदींची उपस्थिती होती.

About The Author