पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

0
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) दिनांक 5 जून रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आली.
सकाळी नऊ वाजता धनगर सोसायटी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहण करून मिरवणुकीची सुरुवात झाली.
ही मिरवणूक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शाहू महाराज चौक या महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत वाजत गाजत ही मिरवणूक अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे अहिल्यादेवी उद्यानात आली.
उद्यानात झालेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोहनराव खिंडीवाले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ के टी ढोणे, डॉ दिलीप मदने, डॉ साईनाथ सोनाळे हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर जयंती समितीचे अध्यक्ष मेजर शिवाजीराव शिंदे, अहिल्या वाहिनी प्रमुख सौ सुनीता मेहेत्रे, गोविंदराव म्हेत्रे, बसवराज बदनाळे, पिराजी बालुरे, परमेश्वर खटके, लखन महाका इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. श्रीगिरे यांनी केले. कमळाबाई कुपे यांच्या अहिल्यादेवीच्या जीवनावरील गीत गायन आणि श्रेया गोविंद उदगिरे,
वैष्णवी श्रीकांत उदगिरे या चिमुकलीच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .मार्गदर्शन करताना मेजर शिवाजीराव शिंदे आणि सुनीता मेहेत्रे यांनी अहिल्यादेवींनी भारतभर केलेल्या कार्याविषयीची माहिती दिली.
याप्रसंगी धनगर समाजातील 10वी आणि 12वी मध्ये विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण विद्यार्थी, एमबीबीएस, इंजीनियरिंग इत्यादी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित विविध क्षेत्रातील पदाधिकारी, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महिला शिक्षक आणि उदगीर मध्ये आहोरात्र जनतेसाठी वैद्यकीय सेवा देणा-या समाजातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर अतिशय उत्साहाने अनेकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हणमंत मेहत्रे व शेषेराव सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयंती समितीचे सचिव प्राध्यापक पिराजी बालूरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदगीर येथील तसेच धनगर सोसायटी, लोणी, वागदरी, बामणी, मादलापूर, होणाळी, येणकी इत्यादी गावातील समाज बांधवांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!