उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी महेश गौरव पुरस्काराने सन्मानित

0
उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी महेश गौरव पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगिले) लातूर जिल्हा माहेश्वरी सभे तर्फे दिला जाणारा यंदाचा महेश गौरव पुरस्कार उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर येथील दयानंद सभागृहात मोठ्या थाटात हैद्राबाद येथील प्रसिद्ध समाजसेवी, उद्योगपती भगवतीजी बलदवा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,या वेळेस अनेक मान्यवरासह समाजप्रेमी,सोनी यांचे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर जिल्हा माहेश्वरी सभे तर्फे प्रत्येक वर्षी महेश भूषण, महेश शौर्य,महेश गौरव,महेश सेवा पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना देण्यात येतो.यंदाचा महेश गौरव पुरस्कार उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना घोषित झाला होता.या वर्षीचा महेश भूषण पुरस्कार लातूर प्रसिद्ध उद्योगपती सनरीच चे बालकिशन मुंदडा यांना गौरव पुरस्कार श्यामसुंदर मानधना, लक्ष्मीकांत सोमाणी,दिनेश गिल्डा यांना महेश सेवा पुरस्कार, रामविलास सोनी अहमदपूर, यतिराज झंवर औराद शहाजानी , डॉ लीला करवा लातूर तर महेश शौर्य पुरस्कार संतोष तोष्णीवाल लातूर यांना देण्यात आला. या वेळेस अखिल भारतीय सदस्य ,पुरस्कार निवड समिती प्रमुख हुकुमचंद कलंत्री यांनी पुरस्कार घोषित करून भगवती बालदवा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.या वेळेस माहेश्वरी सभे चे दक्षणांचलचे ओमप्रकाश भांगडिया,प्रदेश सचिव सत्यनारायण सारडा, लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे अध्यक्ष प्रकाश कासट,सचिव फुलचंद काबरा, उपाध्यक्ष ओमप्रकाश सारडा,उदगीर सभेचे मार्गदर्शक डॉ रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, अशोक बाहेती, सचिव राजगोपाल मणियार, संजय नावंदर,कमल बाहेती,राधेश्याम इनानी, प्रदीप बियाणी,राजेश सारडा, विष्णुदास लोया,ॲड राजू नावंदर, अमोल राठी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती शिवाजी हुडे, जी के इंटरनेशन शाळे चे प्रमुख रमेश बिरादार,सुनील सोनी,शिवाजी पाटील भाकसखेडकर, श्रीकांत सोनी,रामविलास नावंदर,संजयकुमार सोनी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!