बहुजन विकास अभियान च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

0
बहुजन विकास अभियान च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

उदगीर (एल पी उगीले शहरांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीची मिरवणूक उदगीर शहरामध्ये काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे काम सर्व समाजासाठी होते. त्यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. एक महिला असून देखील अत्यंत चांगली कामगिरी त्यांनी त्यांच्या कार्यकर्दीमध्ये पार पाडून महिलाही पुरुषाच्या बरोबरीने काम करतात हे संबंध भारताला दाखवून दिले. त्यांचे कार्य हे सर्व समाजासाठी होते. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जातिवाद केला नाही. असे मत बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी व्यक्त केले. यावेळी मेजर शिवाजी शिंदे, शिवाजी वाकुरे, रामजी पिंपरे, नवनाथ शेषराव भाकसखेडे, लखन महाका, पिराजी वाकुरे, बाजीराव शिंदे, नरसिंग महाका, शिवाजी उजळंबे ,गोरख इचुरे ,ज्ञानोबा भाकसखेडे, वैजनाथ बताने ,श्रीहरी टेकाळे, बाबुराव बदनाळे, महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर आदी अनेक महिला पुरुष उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!