लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटने तर्फे तहसीलदार बोरगावकर यांचा सत्कार

0
लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटने तर्फे तहसीलदार बोरगावकर यांचा सत्कार

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर तहसील कार्यालयात लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटने तर्फे तहसीलदार राम बोरगावकर यांचा सत्कार करण्यात आला. सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शेत रस्ता हा विषय अगदी तळमळीने हातावर घेऊन त्या रस्त्यासाठी स्वतः प्रयत्न करणारे व “सस्ती अदालत “ चे उत्कृष्ट असे आयोजन करून अनेक शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांची लातूर जिल्ह्यातून निवड करण्यात आलेली आहे.
या कार्याबद्दल विभागीय आयुक्त यांच्याकडून दखल घेऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याबद्दल तहसीलदार राम बोरगावकर यांचा शॉल व बुके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील, लातूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ, ज्योतीताई बिरादार, लातूर जिल्हा उपाध्यक्ष विश्वास नरले पाटील, उदगीर तालुका अध्यक्ष धनराज तौर पाटील, मिलिंद वाघमारे पाटील, व बिरादार उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!