3 वर्षीय बालकाच्या अपहरणाचा उलघडा.. अपहरण करणारा आरोपी अटक. बालक सुखरूप पालकांच्या ताब्यात.

0
3 वर्षीय बालकाच्या अपहरणाचा उलघडा.. अपहरण करणारा आरोपी अटक. बालक सुखरूप पालकांच्या ताब्यात.
3 वर्षीय बालकाच्या अपहरणाचा उलघडा.. अपहरण करणारा आरोपी अटक. बालक सुखरूप पालकांच्या ताब्यात.

लातूर (एल पी उगीले) तीन वर्षे बालकाच्या अपहरणाचा नाट्यमय पद्धतीने उलगडा करून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे तर बालकाला त्याच्या पालकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पोलीस ठाणे विवेकांनदच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची उत्कृष्ट कामगिरी झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.26/05/2025 रोजीचे 10.30 वा. दरम्यान गुमस्ता कॉलनी, कव्हा रोड, लातूर येथील एका तीन वर्षीय बालकाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण करून पळवुन घेऊन जाण्याची घटना घडली होती. सदर घटनेवरून वरून पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथे गुरनं 346/2025 कलम 137 (2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दिनांक 26/05/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सपोनि शिनगारे यांनी केला, त्यांची बदली झाल्यानंर सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सचिन रेडेकर हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधीकारी लातूर शहर रणजीत सांवत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांना सखोल मार्गदर्शन व सुचना करून रवाना करण्यात आले होते. दरम्यान सदर पोलीस पथकांने मोठ्या प्रमाणात गोपनिय बातमीदार नेमूण तसेच शास्त्रीय व तांत्रीक पध्दतीचा अवलंब करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेण्यात आले. आरोपी नामे महेश रमाकांत सुर्यवंशी, (रा. सिध्देवर नगर, औसा ता.औसा) याने मुलाचा अपहरण करून त्यास पळून घेऊन गेल्याचे कबूल केले.
विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीस दिनांक 06/06/ 2025 रोजी सोलापूर येथून तर बालकास पंढरपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.सदरचा बालक सुखरूप असून त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आला आहे.
नमूद आरोपीने नेमक्या कोणत्या कारणासाठी बालकाचा अपहरण करून पळवून घेऊन गेला होता? यासंदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधीकारी (लातूर शहर) रणजीत सांवत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथील पोउपनि सचिन रेडेकर, मनिष आंधळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकामधील पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे, रवी गोंदकर, राणा देशमुख, संजय बेरळीकर, रमेश नामदास, सारंग लाव्हरे, सचिन राठोड, आनंद हल्लाळे, दिपक बोंदर, संतोष देवडे, गणेश साठे व शैलेश सुडे यांनी केलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!