पहाटे जिमला जाताना भीषण अपघात: अंबेजोगाई रोडवर इनोव्हा-हार्ले डेव्हिडसनची जोरदार धडक; 1 ठार, 1 गंभीर

0
पहाटे जिमला जाताना भीषण अपघात: अंबेजोगाई रोडवर इनोव्हा-हार्ले डेव्हिडसनची जोरदार धडक; 1 ठार, 1 गंभीर

लातूर (प्रतिनिधी)

लातूरच्या आंबेजोगाई रोडवरील कॉक्सिट कॉलेजसमोर आठ जून रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते राहुल पाटील सास्तूरकर व माजी जिल्हा परिषद सदस्या व सास्तूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. शितल पाटील यांचे चिरंजीव नहुष राहुल पाटील (वय अंदाजे २५) यांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हार्ले डेव्हिडसन बाईक आणि इनोव्हा कार यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, बाईकवरील नहुष यांना जागीच प्राण गमवावे लागले. त्यांच्या सोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नहूष पाटील निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!