जळकोट पोलीस ठाण्यात अमानुष मारहाणप्रकरणी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; ७ दिवसांत निलंबनाची मागणी

0
जळकोट पोलीस ठाण्यात अमानुष मारहाणप्रकरणी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; ७ दिवसांत निलंबनाची मागणी

जळकोट (प्रतिनिधी) – युवासेना जळकोट तालुकाप्रमुख नंदकुमार शिवशेट्टे यांच्यावर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बाचावर व दोन कॉन्स्टेबलांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे ७ दिवसांत निलंबन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांना निवेदनाद्वारे दिला.
ही अमानुष मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद असून त्याचे फुटेज मिळावे, अशीही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असून, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निलंबनाची मागणी करण्यात येईल.
यावेळी जिल्हाप्रमुख ॲड. ब्रम्हाजी केंद्रे, युवासेना जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, महिला आघाडी जिल्हा प्रमुख उर्मिला भगत आदींसह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!