नांदेड महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, ८८ हजार नव्या सदस्यांची नोंदणी

0
नांदेड महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, ८८ हजार नव्या सदस्यांची नोंदणी

नांदेड (प्रतिनिधी) आगामी नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील ६१२ मतदान केंद्रांपैकी ५४२ केंद्रांवर बूथ समित्यांची स्थापना करण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल ८८ हजार नव्या सदस्यांची डिजिटल नोंदणी करण्यात आली आहे. भाजपकडून स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळकटीवर विशेष भर दिला जात आहे.
पक्षाचे माजी आमदार व भाजप महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित ७० बूथ समित्यांचे गठण लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी जिल्हा, शहर आणि मंडळ पातळीवरील सुमारे १,५०० पदाधिकारी सक्रियपणे काम करत आहेत.
भाजपने शहरात “मिशन महापालिका” अंतर्गत भक्कम पाऊले उचलली असून, नव्या सदस्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. या सदस्यांचा वापर निवडणुकीच्या नियोजनात प्रभावीरीत्या करण्यात येणार आहे.
दरम्यान, भाजपकडून उमेदवारांची चाचपणीही सुरू असून, जनसंपर्क, घराघरात जाऊन प्रचार, तसेच सोशल मीडियावरही प्रचार मोहिमेचा जोर वाढवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनीही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असली, तरी भाजपची मोहीम संघटनेच्या पातळीवर आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
भाजपच्या या व्यापक आणि संघटित प्रयत्नांमुळे आगामी निवडणुकीत पक्षाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!