मृगाच्या पूर्वसंध्येला पाच टन माशांची विक्री; रविवारी १० टन विक्री, अंदाज

0
मृगाच्या पूर्वसंध्येला पाच टन माशांची विक्री; रविवारी १० टन विक्री, अंदाज

नांदेड (प्रतिनिधी) मृग नक्षत्र आणि माशांचे जुने नाते कायम राहिले आहे. शनिवारी बकरी ईदमुळे मासळी बाजारात ग्राहकांची वर्दळ तुलनेत कमी होती, तरीही दिवसअखेर सुमारे पाच टन मासे विकले गेले. रविवारी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करत असल्याने, १० टनांहून अधिक मासळी विक्रीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मासे विक्रेते, हॉटेल चालक आणि हॉटेल व्यवसायिकांनी तयारी पूर्ण केली असून, रविवारी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होणार, असा अंदाज आहे.
मृग नक्षत्र आणि रविवार – दुहेरी संधी
मांसाहारासाठी रविवार हा पारंपरिक दिवस मानला जातो. यंदा मृग नक्षत्राचा प्रारंभ रविवारीच होत असल्याने विक्रेत्यांना विक्रीचे ‘डबल बोनस’ मिळण्याची शक्यता आहे. मासे विक्रेते बाबूभाई म्हणाले, “शनिवारी मुस्लिम बांधव बकरी ईद साजरी करण्यात मग्न असल्यामुळे बाजारात त्यांची उपस्थिती कमी होती. मात्र रविवारी सर्व धर्मीय मांसाहारी ग्राहक बाजारात येतील आणि मासळी खरेदीत सहभागी होतील.”
हॉटेल चालक सज्ज, मासे हॉटेलमधूनही उपलब्ध
दरवर्षीच्या अनुभवातून हॉटेल चालक आणि हॉटेल व्यावसायिकांनी माशांच्या विविध प्रकारांसाठी विशेष तयारी केली आहे. रविवारी झणझणीत कालवण, तळलेले मासे, फ्राय आणि कट मसाला यांसारख्या पदार्थांची मोठी मागणी अपेक्षित आहे.

निसर्गाची शहाणीव आणि आहारातील संतुलन

निसर्ग मानवी शरीरासाठी आहाराचे नैसर्गिक संकेत देत असतो. उन्हाळा संपताना शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मासे खाण्याचा पारंपरिक रिवाज आहे. याच काळात जांभळासारखी शीतल फळेही बाजारात येतात. त्यामुळे हवामानातील बदलाशी शरीर सुसंगत राहते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!