दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर द्वारे ‘‘ विकसित कृषी संकल्प अभियान’’ संपन्न
उदगीर (एल.पी. उगिले )
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनस्त दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर तर्फे उन्नत भारत दत्तक ग्राम घोनसी येथे दि.१० जून २०२५ रोजी विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत खरीप हंगामाच्या पुर्व तयारी संदर्भात जनजागृती विशेष कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापक , डॉ.एस. डी. कल्याणकर होते. सदर अभियान खरीप पुर्व शेती व पिक संरक्षण या विषयावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरीता आयोजीत केला होता. या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते प्रा. सुरेश नवले, कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी ‘खरीप हंगामासाठी पुर्वशेतीची मशागत व बि बियांणाची निवड व प्रक्रीया’ या विषयांवर त्यानी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा दरम्यान विद्यापीठाच्या विविध घटक महाविद्यालयाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या घडीपत्रीकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये घोनसी सरपंच श्री कोकणे यांनी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रविण सावळे, समन्वयक, उन्नत भारत अभियान यांनी केले. ३०-४० शेतकरी व ग्रामस्थानी कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रम डॉ. एम. आर. पाटील, सहयोगी अधिष्ठाता, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला.
