शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सवाने साजरा
उदगीर (प्रतिनिधी) :-
जिल्हा परीषद प्राथमीक शाळा सोमनाथपूर येथे दीड महिण्याच्या प्रतिक्षेनंतर शाळा सुरू होत असल्याने शाळा व्यवस्थापनाने शाळा व शाळेच्या परिसराची स्वच्छता करून घेतली होती. शाळेत रांगोळी काढून, फूगे लावून शाळा सजवल्या होत्या. शाळेची घंटा वाजताच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करत शाळा स्तरावर शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
उन्हाळयाच्या जवळपास दीड महिण्याच्या प्रतिदिर्घ सुट्टयानंतर विद्यार्थ्यांच्या नविन शैक्षणिक वर्षांची सुरूवात झाली आहे. शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापनाने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शाळेची घंटा वाजताच विद्यार्थ्यांची होणारी धावपळ दिसून आली. यावर्षी शाळेत पहिल्यांदाच प्रवेशीत होणारे विद्यार्थी मात्र कावरे बावरे होत शाळेत दाखल झाले. कांही विद्यार्थी पालकांच्या सोबत शाळेत आले.
या वर्षी शिक्षण विभागाच्या सुचने नुसार सोमनाथपूर जिल्हा परिषद प्राथमीक शाळा व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उपस्थित शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांना पंचायत समिती शिक्षण विभागाचे विशेष शिक्षक डुबेवार एम. टी. ,गावचे उपसरपंच अमित माडे, सदस्या शिवकर्णा अंधारे यांच्या हस्ते पाठयपुस्तके, शाळेचा गणवेश, शुज देवून व प्रभात फेरी काढून शाळा व्यावस्थापनाने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी गावचे उपसरपंच अमित माडे, सदस्या शिवकर्णा अंधारे, शालेय समिती अध्यक्ष संजय राठोड, उपाध्यक्षा मीना अंधारे, ज्योती सुर्यवंशी, सुशिला तेलंगे, जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती पंचगल्ले , जाधव सुनिल, कळस्कर संदीप, श्रीमती झोले , श्रीमती कांबळे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
