सौ वर्षा केंद्रे यांच्या कर्तव्य दक्षतेमूळे प्रलंबित असलेले अनेक रस्ते खुले झाले.
उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील कुमठा खुर्द च्या महिला सरपंच सौ. वर्षा सुनील केंद्रे व युवा नेते सुनिल केंद्रे यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे अनेक वर्षापासून प्रलंबीत आसनारे रस्ते शेतकर्यासाठी खुली केले आहेत. यामुळे अनेक वर्षापासून शेतकर्यांचा प्रश्न होता, तो सरपंचाच्या विकासदृष्टी व कर्तव्यदक्षतेमुळे निकाली निघाला.गावात मातब्बर राजकिय नेते आसताना ही गावच्या रस्त्याचाा प्रश्न आज पर्यंत निकाली काढता आला नव्हता, पण महिला सरपंच वर्षा केंद्रे व राजकारणाची बाराखडी माहित नाही, म्हणून हिणवले जात होते त्या राजकारणातील नवख्या तरुण युवा नेते सुनिल केंद्रे यांनी या रस्त्याचा प्रश्न निकाली काढल्यामूळे गावात याचे कौतूक होत आहे. गावातिल अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलाा रस्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते रतन माळ आणि रतन माळ ते लोहारा रोड व रतन माळ ते नरसिंगवाडी पाटी रस्ता हे तीन रस्ते बऱ्याच वर्षापासून मजबुतीकरणा पासून वंचित राहिलेले रस्ते होते.या रस्त्यानी साधे चालता ही येत नव्हते, या रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम गावाच्या महिला सरपंच वर्षा केंद्रे व युवा नेते सुनील केंद्रे यांच्या दूरदृष्टीने व प्रयत्नाने मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात झाली. या रस्त्याचे उद्घाटन उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील व ज्येष्ठ नागरिक त्र्यंबक जाधव,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोपाळराव पाटील, अशोकराव केंद्रे, राजभाऊ बिरादार,शिवाजी केंद्रे, प्रवीण कुमठेकर, नंदकुमार केंद्रे, दिनकर केंद्रे,दामोदर केंद्रे, सुधीर पाटील, अर्जुन पाटील, बालाजी केंद्रे,शिवाजी केंद्रे, रवी केंद्रे, पांडुरंग घुगे,नारायण केंद्रे, गोपाळ केंद्रे, शिवाजी जाधव, राजकुमार रणक्षेत्रे, जीवन केंद्रे,अतुल केंद्रे, तुळशीदास पाटील, लक्ष्मण भांगे, विक्रम डिगोळे,महेश स्वामी, महेबूब बागवान, पिंटू बोईनवाड सह मोठयाप्रमाणावर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
