वाढवणा पोलीस स्टेशनला आले जांबाज अधिकारी !!पहिल्याच दिवशी दाखवली धडाकेबाज कामगिरी !!

0
वाढवणा पोलीस स्टेशनला आले जांबाज अधिकारी !!पहिल्याच दिवशी दाखवली धडाकेबाज कामगिरी !!

उदगीर (एल पी उगीले) वाढवणा पोलीस स्टेशन येथे नव्यानेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे रुजू झाले आहेत. यापूर्वी स पो नी भीमराव गायकवाड हे वाढवणा पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून होते.
दरम्यानच्या काळात वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्री आणि इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याची ओरड नागरिकातून होत होती. वाढवणापाटी आणि परिसरातील होलसेल देशी दारू दुकानातून पेट्याच्या पेट्या दुचाकीवरून ग्रामीण भागामध्ये घरपोच दारूची सुविधा राबवली जात असल्याची चर्चा होती. अवैध देशी दारू विक्री करणे आणि बनावट आणि विषारी असलेली हातभट्टीची दारू ग्रामीण भागात विक्री करणे आणि मद्यपींना पुरवठा करणे हे प्रकार चालू असल्याचीही खुलेआम चर्चा होती. कित्येक वेळा सुजाण नागरिकांनी वरिष्ठाकडे तक्रार केल्या होत्या . काही वेळा या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडीही टाकल्या होत्या, तरीही या भागात अवैध दारू विक्री थांबली नव्हती.या गोष्टीची दखल घेत तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने सपोनि सुनील गायकवाड यांनी वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्तबगार पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक बनवून अवैध धंद्याच्या विरोधात सक्रिय कारवाई करण्याचे निर्देश दिले, तसेच त्या पथकासोबत वैयक्तिक स्वतः हजर राहून उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनवली जाते, अशी गोपनीय माहिती हाती लागताच धाड टाकली.
त्या ठिकाणी आरोपी उत्तम भागवत राठोड (वय 47 वर्ष राहणार डोंगरशेळकी तांडा तालुका उदगीर) हा मौजे डोंगरशेळकी तांडा येथील वसंत पवार यांच्या शेतालगत असलेल्या गायरान जागेवर दोन निळ्या रंगाचे प्रत्येकी अंदाजे 200 लिटर क्षमतेचे प्लास्टिकचे ड्रम व एक निळ्या रंगाचा 35 लिटरचा ड्रम, तिन्ही ड्रम मध्ये आंबट व उग्र वास येत असलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरात येणारे गुळ मिश्रित फसफसते रसायन एकूण 435 लिटर, ज्याची प्रतिलिटर किंमत 70 रुपये प्रमाणे एकूण 30450 रुपयाची गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुरन 172 /25 कलम 65 (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये पोलीस हवालदार तुकाराम बळदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा अधिक तपास सपोनी सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक कलकत्ते हे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!