वृक्षमित्र डॉ. प्रकाश येरमे यांच्या शेतात उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या हस्ते कापूर आणि सिंदूर वृक्षाचे रोपण

0
वृक्षमित्र डॉ. प्रकाश येरमे यांच्या शेतात उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या हस्ते कापूर आणि सिंदूर वृक्षाचे रोपण

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी डॉ. प्रकाश येरमे, ज्यांचा केंद्र शासनाने इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्काराने गौरविलेले तसेच महाराष्ट्र शासनाने ही वनश्री पुरस्कार देऊन त्यांच्या पर्यावरण संरक्षणाच्या कार्याचा गौरव केलेला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आकाशवाणीने देखील त्यांना कित्येक कृषी सन्मान पुरस्कार दिलेले आहेत. डॉ. प्रकाश येरमे हे केवळ आकाशवाणीवरून किंवा प्रसिद्धी माध्यमातून मार्गदर्शन करत नसून त्यांनी आपल्या शेतामध्ये 18 प्रकारची फळझाडे लावलेली आहेत. यामुळे प्रत्येक महिन्याला त्या त्या मोसमामध्ये जे येते ते फळ उपलब्ध होऊ शकते. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठीच त्यांच्या शेतीला उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी भेटी देऊन अतिशय दुर्मिळ व वनौषधी असलेल्या सिंदूर आणि कापूर या वृक्षांचे रोपण केले. तसेच इतरही अनेक वेगवेगळ्या वनस्पतीची लागवड करण्यात आली. यापूर्वीही अनेक मोठमोठे झाडे लावलेली आहेत. त्याची पाहणी ही करण्यात आली. याप्रसंगी केदार येरमे, अजय पवार, मारुती कोटलवार, यांच्या सोबतच व्ही एस कुलकर्णी, राम मोतीपवळे यांची उपस्थिती होती. डॉ प्रकाश येरमे यांच्या शेतामध्ये 18 प्रकारच्या विविध फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्याचीही पाहणी सर्व मान्यवरांनी केली. विशेष म्हणजे सीताफळाची अडीच एकरची बागही त्यांनी केलेली आहे, त्याचीही पाहणी करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रात राहूनही लोकांच्या आरोग्याची काळजी घेत घेत निसर्गाची ही काळजी मोठ्या प्रमाणात डॉ. प्रकाश येरमे घेतात, हे पाहून अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या समाजकार्याचे आणि प्रगत शेतीचे कौतुकही सर्वांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!