चिंचोली येथे नेत्रतपासनी शिबीर संपन्न 

चिंचोली येथे नेत्रतपासनी शिबीर संपन्न 

लातूर (प्रतिनीधी) लातुर तालुक्यातील चिंचोली (ब) येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेना ग्रामीण,संजय गांधी निराधार समिती ग्रामीण,तंटामुक्त गाव समिती चिंचोली, उदयगीरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्रतपासनी व माफक दरात शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन  जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित संजय गांधी निराधार समिती सदस्य रमेश पाटील,सौ.शितल राजकुमार सुरवसे,शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजकुमार सुरवसे, तालुका उपप्रमुख संतोष खुणे, प्रशासकीय अधीकारी एस. एस. पाटील, शिबिर समन्वयक गणेश मुंडे,सुरेश तिवारी, सचिन निलंगकर, सावंत, विष्णु शिंदे, उपसरपंच विश्वास कावळे, महादेव भालेकर, भारत कणसे, संभाजी भडंगे, मल्हारी तनपुरे, प्रकाश अंधारे, गोकुळ राऊत, संजय भडंगे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित माण्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून करण्यात आलला. तथा कोरोणा योध्दा म्हणून कोरोणा महामारीत आशा वर्कर यांनी मोलाचे कार्य केले, त्यामुळे गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर शिबिर समन्वयक उदयगीर लाॅयन्स नेत्ररूग्णालयचे पत्रकार  गणेश मुंडे यांचे सामाजिक कार्या पाहून त्याना ही गौरव पत्राने सन्मानित करण्यात आले.

या शिबिरात 447 नागरीकांची नेत्र तपासनी करण्यात आली.त्यात 47 नागरीकावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार असून 12 नागरीकावरती उद्या मोतीबिंदूशस्त्र क्रिया करण्यात येणार आहे.

About The Author