दयानंद कलाची प्रणिता खुली ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत तृतीय

दयानंद कलाची प्रणिता खुली ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत तृतीय

लातूर (प्रतिनिधी) : गजर कवितांचा साहित्य संकुल व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद परळी वैजनाथ यांच्या वतीने खुली ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयातील कु.प्रणिता श्रीकृष्ण कराड हिने सहभाग घेऊन तृतीय क्रमांक मिळवीला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेऊन कविता सादर केल्या. ग्रामीण भागातील मौजे रामेश्वर ता. जि. लातूर येथील या विद्यार्थीनींने हे यश संपादन केले. याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक केले.
प्रणिता कराड या विद्यार्थींनीने खुली ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी सत्कार करून कौतुक केले. याप्रंसगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे,प्रा.संजय कुलकर्णी, प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा. जिगाजी बुद्रुके, प्रा. महेश जंगापल्ले आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!