स्नेहल यल्लावाडची एमबीएसाठी मुंबईच्या आयटीएम काॅलेजमध्ये निवड

0
स्नेहल यल्लावाडची एमबीएसाठी मुंबईच्या आयटीएम काॅलेजमध्ये निवड

उदगीर,(प्रतिनिधी)
कु. स्नेहल संजय यल्लावाड हिची एम बी ए फायनान्स साठी मुंबई येथील आय टी एम या काॅलेजमध्ये निवड झाली आहे.
स्नेहलने कॅट परीक्षेत 92 टक्के गुण प्राप्त केल्यामुळे तिची निवड या महाविद्यालयात झाली आहे. तिने बी बी ए फायनान्स मध्येच पुणे येथील माॅडन काॅलेजमधून पूर्ण केले आहे.
स्नेहलने दहावी विद्यावर्धिनी विद्यालय उदगीर तर बारावी कै. भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय मुक्रमाबाद येथून पूर्ण केले आहे. प्रसिद्ध साहित्यिका तथा शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांची स्नेहल मुलगी आहे.
एम बी ए साठी निवड झाल्याबद्दल स्नेहल व तिचे वडील संजय यल्लावाड व आई वर्षाराणी यल्लावाड- मुस्कावाड यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, धनंजय गुडसूरकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील, प्रा. कुमार बंडे, प्रा धनराज बंडे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!