श्यामलाल प्राथमिक विद्या मंदिरात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

0
श्यामलाल प्राथमिक विद्या मंदिरात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल मेमोरियल प्राथमिक विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष 2025 26 शाळा सुरुवात होण्याच्या पहिल्याच दिवशी, शाळेत येणाऱ्या चिमुकल्या बालकांचे मोठ्या उत्साहात मोफत पाठयपुस्तके व खाऊ देऊन श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणि आर्य तसेच आस्थापना प्रमुख विवेक उगिले,भारत खंदारे, प्रवीण भोळे, राहूल लिमये, विजय बैले, पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2025 _26 च्या सुरुवातीच्या दिवशी “स्कूल चले हम” या गीतावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली.
संस्थाध्यक्ष ॲड. सुपोषपाणि आर्य यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना बालकांच्या शिक्षणाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थी शाळेत हसत खेळत शिकला पाहिजे, विविध सहशालेय उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यास त्यांचा व्यक्तिमत्व विकास चांगल्या पद्धतीने होतो. त्यासाठी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यास आवश्यक ते सहकार्य करावे, असे मत व्यक्त केले.
प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतेश्वर बिरादार यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य उमाकांत सूर्यवंशी यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!